ऋशिकेश :

धन्य तो कान्हा आणि ती माऊली जिच्यामुळे मी झाले आई.

खरच् आयुष्यात आनंद काय असतो ते बाळाचे रडणे घरात ऐकु आल्यावरच समजते. कारण बाळ कितीही रडले तरी जेव्हा ते आई कडे गेल्यावर शांत होते, तो आनंद  फक्त अाणि फक्त त्या आईलाच होतो; आणि म्हणुनच तर म्हण आहे

“हसरे बाळ जगाचे रडके बाळ आईचे”

माझे बाळ जेव्हा घरी अाले तेव्हा ते फक्त ३ महिन्यांचं  होतं. आलं तेव्हा त्याची त्वचा एवढी शुष्क होती आणि वजन पण बेताचेच  होते; पण सासु बाईंचा मायेचा हात फिरला ( तेल पाण्याची आंघोळ ) आणि बघता बघता त्याची त्वचा तजेलदार अाणि बांधा पण सुबक झाला. आमच्या घरात त्याचं  खुप कौतुक केलं गेलं, लाड केले आणि अजुनही सगळे त्याच्यावर अाणि तो सगळ्यांवर मनापासुन प्रेम करतो.

त्याचे पाय घरात लागले  आणि अामच्या घराचे गोकुळ झाले. त्याच्या येण्याने आमच्या जीवनाला एक उद्दिष्ट मिळाले. त्याच्या पायगुणाने अामची पण खुप प्रगति झाली.  त्याच्या घरी येण्याने बायकांचे श्रावणातले व्रत जसे जिवतिका पूजन, पिठोरी, ई. आणि देवाच्या क्रृपेने तो किती लवकर मोठा झाला हे कळले पण नाही.

त्याचं  पालथं पडणं, रांगण्,  बसणं, दुडु दुडु चालणं ह्या बाल लीला  अनुभवणं खुपच सुखावह होतं, जे अजुनही जसंच्या तसं मनात कोरलं गेलं आहे. पहिला शब्द पप्पा बोलणं – त्यांनातर खुपच आनंद झाला ,आणि तेव्हांपासून त्याच्या प्रत्येक आई हाक मारण्यात आणि ते ऐकण्यात माझे मन ,ह्रदय भरुन जात असे

त्याचं पडणं, झडणं,  हरवणं ह्यात काय दुख़् आणि व्याकुळता असते ते अनुभवायला मिळालं.

शाळेच्या पहिल्या दिवसापासुन सगळं खुप मस्त होतं . अाई कामावर जातांना तिचा ड्रेस किंवा अोढणी घट्ट पकडुन जिन्यातच बसुन रहाणे, कधी भोकाड पसरणे, हे सर्व आठवले की आजही मन भरभरुन येते.तेव्हा त्याला सोडुन कामावर जातांना खुप त्रास व्हायचा. लक्ष घरीच  असायचं. पण घरीं येताना जिन्यातच येवुन घटट् बिलगायचा अन त्याचा आनंदी चेहरा बघितला की सर्व दिवसभरातले श्रम विसरुन जायचे.

या वाटचालीत २२ वर्षे चुटकीसरशी निघुन गेलीे. आता वाटतं  तो किती लवकर मोठा झाला.

९ आक्टोबरला तो २३ वर्षचा होईल. त्याने B.Sc.IT केले आहे. शाळा , काँलेज मधे असतांना  तो state level चा foot ball खेळाडू होता, गिटार चे पण त्याला चांगले  ज्ञान आहे. त्याचा एक आल्बम Youtube वर आहे. आता तो IT company मधे आहे.

परत एकदा त्या माउली चे आभार, देवाचे पण ऋण ,कारण एवढा अमुल्य ठेवा आमच्या हाती सुपु्र्द केला. फक्त देवा एकच प्रार्थना तुंझ्याकडे की जो विश्व‍ास आमच्यावर दाखवला तो सार्थ करण्याची शक्ति दे.

लिहित गेले तर खुप होईल. पण थांबते. धन्यवाद .