नाही सोसला मी तुझा भार ९ महिने, नाही दिल्या कळा तुझ्या जन्माच्या,

पण असं कस ग, की मी पण तुझ्या साठी ९ महिनेच वाट पाहिली

तुला पहिल्यांदा हातात घेतल्यावर काळजात काही तरी का हाललं,

असं का वाटलं की ही ओळख आजची नाही, तर खूप जुनी आहे

तू माझी आणि मी तुझी असा का भासलं

उत्तर कशाचीच नाहीत, तर मग तुझ्या श्वासाचा गंध माझ्या सारखा कसा

तुझ्या जन्मदात्रीनं तुला सोडलं असं कस म्हणू,

माझ्या काळजाचा तुकडा अलगद ९ महिने जपला म्हणून कोरडे आभार कसे मानू

तिच्या ऋणातून कशी होऊ मुक्त, का राहू दे ते तसेच जीवनभर,

कुठे ही असेल ती तर खुशाल असू दे, तिच आयुष्य  वेगात पुढे जाऊ दे

दत्तक किंवा पोटचा असा काही नसतं ना ग

आई च्या कुशीतलं पिल्लू एवढंच सत्य असतं ना ग